Torna to Rajgad Trek

तोरणा ते राजगड एक गरुडाचा घरटं तर दुसरा गडांचा राजा म्हणजे तोरणा ते राजगड, एक स्वराज्याचं पहिलं तोरण तर दुसरा स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे तोरणा ते राजगड, एकानं आपल्या पोटात लपलेले गुप्त धन दुसऱ्याच्या बांधकामासाठी देणं म्हणजे तोरणा ते राजगड, झुंजार माचीचा बाणेदारपणा पाहणं तर संजीवनीच्या प्रेमात पडणं म्हणजे तोरणा ते राजगड, बुधला माचीची भव्यता तर सुवेळाची व्यापकता पाहून विचारात पडणं म्हणजे तोरणा ते राजगड, तोरण्यावरून राजगडाचा आभाळाला गवसणी घालणारा बालेकिल्ला डोळ्यांत साठवण म्हणजे तोरणा ते राजगड तर आपले कडेच किती ताशीव आणि बेलाग आहेत हे पाहूनच शत्रूच्या मनात धडकी भरवणारा तोरणा म्हणजे राजगडावरून बघणं म्हणजे तोरणा ते राजगड, शिवकाळात रयतेला आपल्या कुशीत घेऊन त्यांची राखण करणारे महापुरुष म्हणजे तोरणा ते राजगड, या जीवनात आपल्या राजाच्या गडांच्या संवर्धनांसाठी झटायचं हे स्वप्न उराशी बाळगून सुरु केलेला प्रवास म्हणजे तोरणा ते राजगड, सह्याद्रीतले दुर्गम घाट असो वा मुसळधार पाऊस वा खेड्यातील अतिगुळगुळीत रस्ते वा कोकणातली किनारपट्टी डौलानं स्वराज...