आमचं राजं छत्रपती झालं...!

हिंदुस्थानच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक. विजयनगर व देवगिरीचे साम्राज्य लोप पावल्यानंतर मध्ययुगीन भारतात या भारतभूमीवर परकीयांनी उच्छाद मांडला होता तेव्हा उत्तरेकडील राजे महाराजे या परकीयांचे मांडलिक बनून त्यांची सेवा करण्यात आपली धन्यता मानीत होते त्यावेळी महाराष्ट्रात या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्याचा अग्नी पेट घेत होता. शहाजी राजांनी स्वराज्याचा पाया रचला पण त्यांना काही ठिकाणी अपयशाला सामोरे जावे लागले. स्वराज्यसंकल्पक शहाजी महाराजसाहेब व सतत या स्वराज्याची मायमाऊली बनून राहिलेल्या स्वराज्यप्रेरिका जिजाऊ माँसाहेबांच्या पोटी जन्माला आलेल्या शिवसुर्याने, अंधकारात होरपळून गेलेल्या या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवत इथल्या रयतेवर मायेचं छत्र धरलं अन रयतेचे राजे, रयतेचे छत्रपती झाले. रायरेश्वरी शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली व तोरणा गडी स्वराज्याचं पहिलं रोपटं लावलं. शिवरायांनी ह्या स्वराज्याच्या रोपट्याचं बीज इथल्या गोरगरीब रयतेच्या मनात पेरलं, हे स्वतंत्र राज्याचं रोपटं वाढविण्यासाठी शिवरायांनी साऱ्या बारा बलुतेदार,अठरापगड...