किल्ले रोहिडा व रायरेश्वर पठार

स्वातंत्र्यदिन मोहीम किल्ले रोहिडा व रायरेश्वरच पठार १५ ऑगस्ट २०१७ राहून गेलेला रोहिडा रायरेश्वरचा ब्लॉग सह्याद्री, इथं येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या सौंदर्याची भुरळ तर पाडतोच पण पावलोपावली इथं घडलेल्या इतिहासाची साक्षही देतो. गगन भेदू पाहणारा सह्याद्री, रयतेच्या स्वतंत्र्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांचा पराक्रम ही कसा उत्तुंग व अफाट आहे याची जाणीव करून देतो. परकीय आक्रमणांना उधळून लावत ज्या गडकोटांच्या छायेखाली सह्याद्रीच्या पदरात हे स्वराज वाढलं ते गडकोट सुद्धा स्वातंत्र्याची प्रतीके आहेत. त्यामुळे नेहमी प्रमाणे यंदाचाही स्वातंत्र्यदिन सह्याद्रीत साजरा करून हॅट्रिक साधायची होती पण जून जुलै मधेच रायगड, हर्णे बंदर, फत्तेगड, तिकोना अशी भटकंती झाल्यामुळे १५ ऑगस्ट साठी घरून परवानगी भेटेल याची खात्री न्हवती त्यामुळे कोणतही प्लानिंग केलं न्हवतं. पण तरी जवळच अगोदर पुरंदर जायचं ठरलं पण निलेश बोलला पोर लांब जायला नको म्हणतायत मग वाटलं यावेळी अता कात्रज लेकवरच समाधान मानावे लागेल की काय पण सकाळी ८ ला परत विक्याला फोन केला कुठं जायचं तर म्हंटला सर्दीने जाम झालोय आणि किल्यावर जायचं म्हं...