स्वामी दरियाचे
"आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी आहे. तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र." त्या काळातील आरमाराचे अप्रतिम वर्णन आमात्यांनी आज्ञापत्रात केले आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर दुर्गम, बेलाग दुर्गांच्या साथीने वाढणारा स्वराज्याचा डोलारा आता त्याला गरज होती ती बुलंद आरमाराची. ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे महाराजांनी जाणले होते. समुद्राकडील स्वराज्याच्या सीमा मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी छ. शिवरायांनी मराठा आरमाराची स्थापना केली.
महाराजांनी १६५७ साली कल्याण, भिवंडी जिंकल्यानंतर या बंदरांमध्ये जहाज बांधणीला सुरुवात झाली. सुरवातीला २० गलबतांपासून निर्मिती सुरु केली हि गलबते जंजिऱ्याच्या सिद्द्दी विरुद्ध वापरण्यात येणार होती. समुद्रावर सत्ता गाजवणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्दी यांना लगाम लावत मराठ्यांचं आरमार सागरावर आपाले निशाण फडकवण्यासाठी सज्ज होते. आरमाराची बांधणी करत असताना या आरमाराची बाजू भक्कमपणे पेलण्यासाठी दर्यासारंग, मायनाक भंडारी, दौलतखान, लायजी पाटील, इब्राहिमखान, तुकोजी आंग्रे यांसारख्या मातब्बर सरदारांची साथ छ. शिवरायांना लाभली.
व्हॉईसरॉय कोंडे दे सॅन व्हिन्सेंट १६६७ च्या शेवटी पोर्तुगालला परतणे आपल्या राजाला कळवतो. "मला शिवाजीच्या नौदल जहाजापासून भीती वाटते. आम्ही पुरेसे निवारक पाऊल उचलले नाहीत आणि म्हणून त्यांनी कोकण किनाऱ्यावर एक किल्ला बांधला आहे. आज त्याच्याकडे अनेक जहाज आहेत आणि ते मोठे आहेत". मराठ्यांच्या गतिमान गलबत, गुराबांचा चांगलाच धसका पोर्तुगीज इंग्रजांच्या मोठ्या मोठ्या जहाजनीं घेतला होता. महाराजांनी आरमाराला बळकटी देऊन त्याच्या संरक्षणासाठी तसेच व्यापार, रयतेचे रक्षण ,संदेशवहन यांचे महत्व लक्षात घेऊन १६६४ साली कुरुटे बेटावर नवीन जलदुर्गाची बांधणी केली. सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांना शह देत सिंधुसागरावर अधिराज्य गाजवण्यासाठी शिवलंका सिंधुदुर्ग सज्ज होता. काही किल्यांची नव्याने निर्मिती करून तर काहीं जिंकून त्यांची डागडुजी करून आरमाराला बळकटी देण्यासाठी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, कुलाबा, खांदेरी अशा अनेक जलदुर्गांची फळी उभी केली. इ. स. १६६५ साली याच आरमारावर स्वार होऊन महराजांनी त्यांची पहिली सागरी मोहीम कारवार जवळील बसनूरवर छापा टाकला. आरमारात प्रामुख्याने गलबत, गुराब, पाल , मचवा, शिबाड हि महत्वाची जहाजे होती.
पोर्तुगीजांवर जरब बसवण्यासाठी कारवार नजीक गोव्याच्या हद्दीवर बेतूल गावी साळ नदी जिथे समुद्राला मिळते तिथे नदीच्या मुखाशी किल्ला बांधण्याचा आदेश महाराजांनी बळ्ळीच्या हवलदाराला दिला. आजमितीला किल्यावर एक बुरुज आणि त्यावर बसवलेली तोफ एवढाच भाग शिल्लक आहे. हिस्टरी लव्हर्स ग्रुप गोवा व तेथील गावकऱ्यांकडून हा किल्ला जतन करण्याचे काम सुरु आहे. यांच्याकडून जरवर्षी किल्यावर शिवजयंती साजरी केली जाते.
"राजश्री आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हांस अगत्य" या वाक्याला सजेशी अशी कामगिरी करून शंभू छत्रपतींनी कमी कालखंडात आरमारावर आपली मजबूत पकड निर्माण केली. जंजिऱ्याच्या सिद्दीला जेरीस आणण्यासाठी उसळत्या लाटांवर स्वार होऊन. दर्याला वेसण घालत जंजिऱ्यावर हल्ला केला. हल्ला इतका जोरदार होता कि औरंगजेबाला वाटले जंजिरा आता पडतो कि काय आणि जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर मराठे समुद्रावर राज्य करतील आणि त्यामुळे त्याने हसन अली नावाचा सरदार स्वराज्यावर पाठवला हसन अली ४० हजारांची फौज घेऊन रायगडाकडे येत होता त्यामुळे शंभू छत्रपतींना जंजीऱ्यातून माघार घ्यावी लागली पण मराठा आरमाराचा कायमस्वरूपी धाक हबशी सिद्दी खैरात खान, सिद्दी कासम खान यांना बसला.
पुढे १६८२ च्या सुरवातीला शंभू राजांनी अंकोला, कारवार जिंकून घेतले आणि पोर्तुगीजांची काही व्यापारी जहाजे पकडली व अंजनदीव बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली डॉ. लुईस गोंकलेव्हीज याने २७ एप्रिल १६८२ व्हॉईसरॉय याला पत्र लिहले कि, एका दुभाष्याने मला कळवले आहे की संभाजीने अंजनदीव येथे दगड आणि चूने पाठविली आहेत आणि किल्ल्याची उभारणी करण्यासाठी पैसे काढू नये अशी मागणी केली आहे. म्हणून, तेथे जहाजे पाठविण्यास विलंब करणे अवांछित असेल. असे आदेश संभाजी राजांनी दिले आहेत. पोर्तुगीज जाणून होते कि मराठयंनी चौल,रेवदंडा ताब्यात घेऊन खांदेरी चा किल्ला बांधला होता. त्यामुळे आता जर अंजनदीवला किल्ला बांधला तर पुढे गोव्याला त्रास होऊ शकतो तसेच संभाजी राजांला दांडा राजपुरीच्या लढाईत सिद्दी विरुद्ध अरबांनी मदत केली होती व अरब मराठा आरमारात प्रमुख पदावर आहेत.पोर्तुगीज व अरब हे एकमेकांचे शत्रू होते त्यामुळे पुढे संभाजी राजे अंजनदीवला अरब सुभेदार नेमतील याची भीती होती म्हणून अंजनदीव वाचवण्यासाठी पोर्तुगीजांनी हालचाली सुरु केल्या गोव्याला धान्याचा पुरवठा कर्नाटकातून होत असे त्यामुळे येथे मराठ्यांनी किल्ला बांधला तर पुढे आपणास त्रास होईल हे लक्षात घेऊन किल्ला बांधण्याच्या आधीच पोर्तुगीजांनी अंजनदीवचा ताबा घेऊन पुढच्या पाच महिन्यात तिथे किल्ला बांधला. पुढे व्हॉईसरॉयने छ. संभाजी राजांशी कोणतेही वैर पत्करायचे नाही असे ठरवले. संभाजी राजांना पुत्र झल्याचे कळताच २८ जुलै १६८२ साली त्याने भेटवस्तू व अभिनंदनपर पत्र पाठवले. संभाजी राजांनी व्हॉईसरॉयला कळवले कि आम्ही कुडाळ आणि डिचोली येथे दारुगोळा कारखाना सुरु केला आहे त्यासाठी लागणारा माल कर्नाटक व मलबार येथून समुद्रमार्गे आणला जाईल त्यात पोर्तुगीजांनी कोणताही अडथळा आणू नये. व्हॉईसरॉयने हि अट मान्य करून मराठ्यांसोबत मैत्रीचे संबंध ठेवण्याचे मान्य केले तरी पुढे पोर्तुगीज मुघलांना मदत करत राहिले त्यामुळे पुन्हा छ. संभाजी राजांनी पोर्तुगीजांवर जरब बसवण्याचे ठरवले. १६८३- ८४ साली चौल रेवदंडाचा वेढा,फोंड्याची लढाई या जमिनीवरील लढाईत विजय मिळवल्यानंतर वसई, दमण कडील काही भाग, कारंजा(उरण), जुवेम किल्ला, कुंभारजुवे बेट, मांडवी नदीवरील काही प्रदेश या बेटांवर मराठा आरमाराने विजय मिळवला.
१३ डिसेंबर १६८३ च्या पत्रात व्हायसराय म्हणतो, "शत्रूने जाहीर केले आहे गोव्यामध्ये पोर्तुगीज आणि ख्रिश्चन यांचा काहीही पत्ता नाही लागला पाहिजे". शंभू राजांनी कमी कालावधीत मोठ्या पराक्रमाने सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, डच यांना सगळ्या आघाड्यांवर रोखून धरले होते.
पुढे १८ व्या शतकाची सुरुवात मराठा आरमाराचा सुवर्णकाळ ठरला. समुद्रावरचा शिवाजी म्हणून ओळखले जाणारे मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे समुद्रावर मराठयांचं निशाण फडकवत बेपनहा हुकूमत गाजवत होते. शिवरायांनी रचलेला आरमाराचा पाया त्याच्यावर कळस चढवून कान्होजी आंग्रे व त्याच्या नेतृत्वाखाली मराठा आरमार समुद्रावर सत्ता गाजवत होत. पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रज या सगळ्यांवर जरब बसवून संपूर्ण कोकण किनारपट्टी मराठा सत्तेखाली आणण्यात त्यांनी मोलाचे कार्य केले.
कान्होजींच्या ६ मुलांपैकी संभाजी व तुळाजी यांनी सुद्धा आपल्या पराक्रमाची चमक दाखवून दिली. जसे जमिनीवर रणमार्तंड मराठे संताजी - धनाजी पराक्रम गाजवत होते तसाच पराक्रम दर्यावर्दी मराठे संभाजी व तुळाजी सिंधुसागरावर हुकूमत गाजवत होते. छ. शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीत निर्माण केलेले आरमार ज्या रीतीने वाढवले व जलदुर्गाच्या रूपाने नवीन नाविक केंद्र निर्माण केली. आपल्या स्वामींनी निर्माण केलेल्या आरमाराचा विस्तार करत भारताच्या इतिहासात मराठा आरमाराचे नाव आजरामर केले. छ. शिवरायांनी परकीय आक्रमणांना रोखून, बलाढ्य आरमाराची निर्मिती केली भविष्यातली आरमाराची गरज लक्षात घेता समुद्रात शिवलंका सिंधुदुर्ग सारखी नाविक केंद्र उभारली, स्वरज्याच्या सीमा सिंधू सागराला भिडवल्या व कोकण किनारपट्टी सुरक्षित करून रयतेच्या मालाला चालना देऊन व्यापाराचे धोरण अवलंबले या सगळ्यात महाराजांना साथ लाभली ती आपल्या स्वराज्यासाठी व धन्याच्या शब्दाखातर जीवाची बाजी लावणाऱ्या दर्यासारंग, मायनाक भंडारी, दौलतखान, लायजी पाटील कोळी, इब्राहिमखान, धुळप व आंग्रे घराणे अशा एकनाअनेक दर्यावर्दी मराठ्यांची म्हणूनच कि काय आज भारतीय नौदलाचे जनक म्हणजेच Father of Indian Navy म्हणून छ. शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते.
२४ ऑक्टोबर
मराठा आरमार दिन

Comments
Post a Comment