Posts

Showing posts from 2019

भोर्डी वीरगळ संवर्धन मोहीम

Image
उन्हाळा सरू लागला कि सह्याद्रीला सुद्धा पावसाची चाहूल लागते कारण उन्हामुळे भाजून निघून अजूनच मजबूत झालेले त्याचे ताशीव कडे , सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभी असलेली वनसंपदा , त्याच्या कुशीत उन्हात पाण्याच्या शोधत असणारे प्राणी ,   उन्हांमुळं उजाड पडलेला सह्याद्रीचा माथा हे सारेच वरुण राजाच्या वर्षावात नाहून निघण्यासाठी आतुर असतात. मग ह्यात सह्याद्रीची वारी करणारे वारकरी तरी कसं काय मागं राहतील. जसा जसा जूनचा महिना सरू लागतो तसा सह्याद्री त्याच्या भाळी चढलेला पिवळा भंडारा उतरुवून हिरवा शालू पांघरण्यासाठी सज्ज असतो तसं आमचं जून चालू झाला कि यंदाचा स्वातंत्र्यदिन कोणत्या गडावर साजरा करायचा याची शोधाशोध चालू होते. तसा वर्षातून दोन वेळा आमचा स्वातंत्र्यदिन साजरा होतो. एक म्हणजे १५ ऑगस्ट तर दुसरा ६ जून जेव्हा इथल्या भूमीवर परकीयांनी उच्छाद मांडून संपूर्ण रयत नागवून ठेवली होती कित्येक वर्ष ह्या महाराष्ट्राची भूमी परकीयांच्या अंधकारात हरवून गेली होती तेव्हा इथला अंधकार दूर सारून रांगड्या सह्याद्रीच्या साथीनं इथल्या रयतेत स्वातंत्र्याची मशाल पेटवून स्वराज्य निर्माण करून महाराजांनी र...

रणसंग्राम फोंड्याचा, किल्ले फोंडा, गोवा

Image
परशुरामाची यज्ञभूमी गोमांचल पर्वत ,  गौ म्हणेज बाण. परशुरामाचा बाण जिथपर्यंत पोहचला तो गोमंत म्हणेजच गोमंतक आणि आजचा गोवा. मौर्य , कदंब , यादव , बहामनी पुढे आदिलशाही , पोर्तुगीज अशा प्रमुख राजवटी गोव्यात नांदल्या त्यातल्या कदंबांनी गोव्यावर सर्वाधिक वर्षे सत्ता गाजवली.   गोवा म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर योतो तो अथांग पसरलेला निळाशार समुद्र,  फेसाळणाऱ्या लाटा,  किनाऱ्यावर चमचमणारी सोनेरी वाळू अन किनारपट्टीवर डोलणाऱ्या नारळाच्या बागा.   गोव्याबद्दल प्रत्येकाच्या मनात कुतूहल हे असतेच . गोवा प्रत्येकाला कोणत्या कोणत्या कारणाने खुणावत असतो .  कधी कोणाला गोयंकरांच्या शांत,   मनोसक्त,   निवांत जगण्याच्या शैलीमुळे खुणावतो तर कोणाला " आरं तिकडं लय स्वस्त भेटते "   हे एकच वाक्य खुणावते,   कॉलेजमध्ये असताना जिवलग मित्रांनी गोव्याचा प्लॅन केला नसेल तर ते जिगरी असूच शकत नाहीत,   कारण गोवा म्हणजे तरुणाईसाठी जणूकाही पंढरपूरचं झालंय एकदा का होईना गोव्याचा वारीला गेलंच पाहिजे.   देवाने गोव्यावर नैसर्गिक सौंदर...