भोर्डी वीरगळ संवर्धन मोहीम

उन्हाळा सरू लागला कि सह्याद्रीला सुद्धा पावसाची चाहूल लागते कारण उन्हामुळे भाजून निघून अजूनच मजबूत झालेले त्याचे ताशीव कडे , सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभी असलेली वनसंपदा , त्याच्या कुशीत उन्हात पाण्याच्या शोधत असणारे प्राणी , उन्हांमुळं उजाड पडलेला सह्याद्रीचा माथा हे सारेच वरुण राजाच्या वर्षावात नाहून निघण्यासाठी आतुर असतात. मग ह्यात सह्याद्रीची वारी करणारे वारकरी तरी कसं काय मागं राहतील. जसा जसा जूनचा महिना सरू लागतो तसा सह्याद्री त्याच्या भाळी चढलेला पिवळा भंडारा उतरुवून हिरवा शालू पांघरण्यासाठी सज्ज असतो तसं आमचं जून चालू झाला कि यंदाचा स्वातंत्र्यदिन कोणत्या गडावर साजरा करायचा याची शोधाशोध चालू होते. तसा वर्षातून दोन वेळा आमचा स्वातंत्र्यदिन साजरा होतो. एक म्हणजे १५ ऑगस्ट तर दुसरा ६ जून जेव्हा इथल्या भूमीवर परकीयांनी उच्छाद मांडून संपूर्ण रयत नागवून ठेवली होती कित्येक वर्ष ह्या महाराष्ट्राची भूमी परकीयांच्या अंधकारात हरवून गेली होती तेव्हा इथला अंधकार दूर सारून रांगड्या सह्याद्रीच्या साथीनं इथल्या रयतेत स्वातंत्र्याची मशाल पेटवून स्वराज्य निर्माण करून महाराजांनी र...