Torna to Rajgad Trek
तोरणा ते राजगड
एक गरुडाचा घरटं तर दुसरा गडांचा राजा म्हणजे तोरणा ते राजगड,
एक स्वराज्याचं पहिलं तोरण तर दुसरा स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे तोरणा ते राजगड,
एकानं आपल्या पोटात लपलेले गुप्त धन दुसऱ्याच्या बांधकामासाठी देणं म्हणजे तोरणा ते राजगड,
झुंजार माचीचा बाणेदारपणा पाहणं तर संजीवनीच्या प्रेमात पडणं म्हणजे तोरणा ते राजगड,
बुधला माचीची भव्यता तर सुवेळाची व्यापकता पाहून विचारात पडणं म्हणजे तोरणा ते राजगड,
तोरण्यावरून राजगडाचा आभाळाला गवसणी घालणारा बालेकिल्ला डोळ्यांत साठवण म्हणजे तोरणा ते राजगड तर आपले कडेच किती ताशीव आणि बेलाग आहेत हे पाहूनच शत्रूच्या मनात धडकी भरवणारा तोरणा म्हणजे राजगडावरून बघणं म्हणजे तोरणा ते राजगड,
शिवकाळात रयतेला आपल्या कुशीत घेऊन त्यांची राखण करणारे महापुरुष म्हणजे तोरणा ते राजगड,
या जीवनात आपल्या राजाच्या गडांच्या संवर्धनांसाठी झटायचं हे स्वप्न उराशी बाळगून सुरु केलेला प्रवास म्हणजे तोरणा ते राजगड,
सह्याद्रीतले दुर्गम घाट असो वा मुसळधार पाऊस वा खेड्यातील अतिगुळगुळीत रस्ते वा कोकणातली किनारपट्टी डौलानं स्वराज्याचा भगवा फडकवत नावा प्रमाणे सह्याद्रीची सफारी घडवून आणणाऱ्या सफारीतून गडाच्या पायथ्याला पोहचणं म्हणजे तोरणा ते राजगड,
३ किलो मटण ४ एक किलो तांदूळ २० एक लिटर पाणी आणि स्वतःची बॅग वेगळीच एवढा लवाजमा घेऊन चढाईनं सुरु करणं म्हणजे तोरणा ते राजगड,
सह्याद्रीच रांगडं रूप त्यात आमच्या सारखी हौशी मंडळी मग फोटोसेशन करत चढायला ३-४ तास लागण म्हणजे तोरणा ते राजगड,
तोरण्याचा इतिहास भौगोलिक माहिती याची लेनदेन करत गड गाठणं म्हणजे तोरणा ते राजगड,
या दोस्ताची थोडी घे त्याची थोडी घे करत जगलेली भटकंती म्हणजे तोरणा ते राजगड,
पोहचल्यावर मेंगाई देवीच्या मंदिरात ताणून आमदार साहेब जादू अन बाबा यांनी दिलेला पॉवर नॅप म्हणजे तोरणा ते राजगड,
तिकडं आम्ही पॉवर नॅप होईपर्यंत बालेकिल्ला झुंजार माची तटबंदी सारंकाही पिंजून काढणं म्हणजे तोरणा ते राजगड,
सह्याद्रीत कुठेही असो कितीही कोंबली तरी सदैव आम्हला सामावून घेणाऱ्या वारी गडकोटांचीच्या हक्काच्या घरासाठी जागा शोधणं म्हणजे तोरणा ते राजगड,
लाकडं गोळा करून चूल पेटवून आता कस आमदार झल्यासारखं वाटणारा स्वप्न्या म्हणजे तोरणा ते राजगड,
पोटाची खळगी भरण्यासाठी वारी गडकोटांचीचा मुकादपखाना सांभाळणाऱ्या पवार साहेबांना लाडीगुडी लावत जळणं आणा हे काप ते काप म्हणत केलेली मदत म्हणजे तोरणा ते राजगड,
तोरणागडी फडकलेला भगवा अटक पार करून आला अन याच तोरण्यावरचा भाव जीर्ण झालायं हे पाहून इकडं मटण शिजेपर्यंत आखलेला मनसुबा म्हणजे तोरणा ते राजगड,
मटण म्हंटल्यावर आता पंचायत झाली कि म्हणून बाबा महराजांनी ग्रेव्ही आणि भातावर मानलेलं समाधान म्हणजे तोरणा ते राजगड,
थकून भागून कसं बस बूस्टर मारत चढलेल्या निक्यानी नळी वर आडवा मारलेला हात म्हणजे तोरणा ते राजगड,
ग्रुपचे करण अर्जुन दादासाहेबांचे लाडके शशी शुभम आर थोडं घे कि म्हणत फस्त करणं म्हणजे तोरणा ते राजगड,
आणि आमचं म्हणजे घास उचलून तोंडात घाले पर्यंत भर्राट वारा अन थंड झालेला घास घेणं म्हणजे तोरणा ते राजगड,
तर तिकडं उडालो रे म्हणत बाबा राजगडावर पोहोचणं म्हणजे तोरणा ते राजगड,
तोरण्यावर भूत दिसतात हे ऐकलं होत इथं आधीच सात भूत येऊन पडल्यावर कसलं भूत येतंय म्हणून पडी देणं म्हणजे तोरणा ते राजगड,
आधीच झोपायची लगबग आणि त्यात मोठ्या आमदारांनी जास्त जागा अडवून FSI कमी करणं म्हणजे तोरणा ते राजगड,
आता झोप कसली सोबतीला जिवलग मित्र अन सह्याद्रीचा थंडगार वारा वर्षांचा शेवटचा दिवस शेकोटी करून इतिहासाचा जागर करत बरोबर जुन्या ट्रेक्सचे किस्से कॉलेजच्या आठवणी जगणं म्हणजे तोरणा ते राजगड,
जेमतेम २-३ तास एक हात याच्या अंगावर तर एक त्याच्या अंगावर पण ५ स्टार हॉटेल पेक्षा भारी झोप तर राजगडाकडून नववर्षाची नवी किरणे घेऊन दर्शन देणाऱ्या सूर्या शेठला बघण्यासाठी लवकर उठणं म्हणजे तोरणा ते राजगड,
त्याआधी इकडं पवार साहेबांनी कालचा आखलेला आण बाण शान असणाऱ्या भगव्याचा मनसुबा पुरा करून गारद देण म्हणजे तोरणा ते राजगड,
गडासाठी उन्हातान्हात दगड घडवणाऱ्या कामगारांसोबत चर्चा करून काल आम्ही घेतलेले दगड जागच्या जागी ठेवणं म्हणजे तोरणा ते राजगड,
सगळा लवाजमा सावरून राजगडाच्या वाटेकडे डोळे लावत पण त्याआधी ज्यासाठी या मोहिमेची आखणी केली होती ते काम पूर्वत्वास नेऊन म्हणजे तोरण्याची स्वछता जमलं तेवढा कचरा उचलून साचलेल्या बाटल्यांचा ढीग मार्गी लावून राजगडाची वाट धरण म्हणजे तोरणा ते राजगड,
तर इकडं आमदार वेगळ्या पद्धतीने मनोधैर्य वाढवण्याचे काम करत होते त्यात विकेट पडली ती निक्याची ते तोरण्यावरूनच माघारी फिरू T2R पुन्हा कधी तरी त्यात जादूला T2R साठी बुस्टरन दिलेली जादुई एनर्जी म्हणजे तोरणा ते राजगड,
तोरणा उतरू लागताच कोकण दरवाजा जवळ R2R करत अलेली बा रायगडची पोर भेटली त्यात भेटलेला अवलिया गोट्या सुतार अन त्यानंतर कुठं ना कुठं नक्की गाठ पडणारा गोट्या म्हणजे तोरणा ते राजगड ,
बुधला माचीच अवाढव्य रूप पाहत शेवटचा अवघड रडतोंडीचा बुरुज उतरण म्हणजे तोरणा ते राजगड,
नावाप्रमाणे प्रचंडगडाची प्रचंडता डोळ्यात साठवून संजीवनी माचीची आस लागणं म्हणजे तोरणा ते राजगड,
T2R होण्याआधीच मोक्कार पाच-सहाशे फोटो होणं म्हणजे तोरणा ते राजगड,
वाटत तहान लागल्यावर पाण्याची कमतरता लक्षात घेऊन कोरडाच ठासलेला ग्लूकोंडी म्हणजे तोरणा ते राजगड,
पाठीवरच वज ह्या खांद्यावरून त्या खांद्यावर करत एवढ्या एवढ्या बॅगेत फक्त एक ब्लॅंकेट भरून बॅग फुगवतो अश्या आमच्या सारख्या गरिबाला पडणाऱ्या शिव्या झेलण म्हणजे तोरणा ते राजगड,
तिकडं खोपडे वस्तीच्या अलीकडं चुकलेली वाट अन नेहमीप्रमाणे आवाज देऊन या इकडं या म्हणत चुकलेल्या भटक्यांची मदत करून वाट दवणारी सह्याद्रीतली जीवाची माणसं म्हणजे तोरणा ते राजगड,
संजीवनी माचीची खडी चढाई करून अद्भुत अशी राजगडाची याआधी कधीही न पाहिलेली पार सुवेळा माची पर्यंत गडाची हि बाजू बघणं म्हणजे तोरणा ते राजगड,
शिवरायांच्या स्थापत्यशास्त्राच्या उत्तम नमुना म्हणजे संजीवनी माचीची विलोभनीय तंत्रशुद्ध बांधकामशैली पाहणं म्हणजे तोरणा ते राजगड,
गाडी तिकडं तोरण्याच्या पायथ्याला आहे हे माहित असूनसुद्धा संजीवनीच्या प्रेमात पडून अस्ताला जाणाऱ्या ना सूर्याचे फोटो काढणं म्हणजे तोरणा ते राजगड,
मंद प्रकाशात बालेकिल्ल्याला बिलगून पाली दरवाजाची वाट धरण म्हणजे तोरणा ते राजगड,
एवढ्या रात्री कोणतंही वाहन नसताना राजगडाच्या पायथ्यावरून पुन्हा गाडीसाठी तोरण्याचा पायथा कसा गाठायचा एवढी लागली असताना देखील निवांत उतरण म्हणजे तोरणा ते राजगड,
अंधारात घसरत पडत सुजलेल्या अंगठ्यानी पायांना ब्रेक लावत बिअर ग्रिल्स बनणं म्हणजे तोरणा ते राजगड,
तर तेवढ्यात विक्याची चेन्नईच्या दोन सुपरकिंग्ज सोबत झालेली मैत्री म्हणजे तोरणा ते राजगड,
खाली गावात पोहोचल्यावर कुठलंच वाहन भेटत नाही असं लक्ष्यात आल्यावर कामाला आले ते काही माहित नसताना पाच वाजत गड चढायला सुरु करणारी चेन्नईची दोन पोर अन त्यांना परत खाली आणण्यात आणि त्यांची गाडी उसनी मागण्यात यशस्वी झालेला विक्याचा स्पोकनचा क्लास म्हणजे तोरणा ते राजगड,
रात्री थंडीत सफारी साठी पुन्हा बाईकची सफारी करत मी आणि विक्यानी तोरण्याचा पायथा गाठून थंडीत गारठून पुन्हा भोसलेवाडी गाठणं म्हणजे तोरणा ते राजगड,
चेन्नईच्या दोन सुपरकिंग्जला थँक यु म्हणून इंजिनियरच्या मदतीला धावून आलेले इंजिनीअर म्हणजे तोरणा ते राजगड,
विक्याच्या इंग्लिश न प्रसन्न होऊन तारलेला ट्रेक म्हणजे तोरणा ते राजगड,
सरतेशेवटी काय तर मजल दरमजल करत रणरणत्या उन्हात उठतं बसतं घेत डोगररांगा पार करत सह्यादरची आडवाट तुडवत रात्री पुढं काय वाढून ठेवलंय याची तमा न बाळगता शिवराय असे शक्तीदाता म्हणत जीवाला जीव देणाऱ्या मित्रांसोबत जगलेली भटकंती म्हणजे तोरणा ते राजगड.
वारी गडकोटांची...
👌👌
ReplyDelete👌👌👌
ReplyDelete