Posts

Showing posts from 2020

आमचं राजं छत्रपती झालं...!

Image
हिंदुस्थानच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक. विजयनगर व देवगिरीचे साम्राज्य लोप पावल्यानंतर मध्ययुगीन भारतात या भारतभूमीवर परकीयांनी उच्छाद मांडला होता तेव्हा उत्तरेकडील राजे महाराजे या परकीयांचे मांडलिक बनून त्यांची सेवा करण्यात आपली धन्यता मानीत होते त्यावेळी महाराष्ट्रात या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्याचा अग्नी पेट घेत होता. शहाजी राजांनी स्वराज्याचा पाया रचला पण त्यांना काही ठिकाणी अपयशाला सामोरे जावे लागले. स्वराज्यसंकल्पक शहाजी महाराजसाहेब व सतत या स्वराज्याची मायमाऊली बनून राहिलेल्या स्वराज्यप्रेरिका जिजाऊ माँसाहेबांच्या पोटी जन्माला आलेल्या शिवसुर्याने, अंधकारात होरपळून गेलेल्या या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवत इथल्या रयतेवर मायेचं छत्र धरलं अन रयतेचे राजे, रयतेचे छत्रपती झाले. रायरेश्वरी शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली व तोरणा गडी स्वराज्याचं पहिलं रोपटं लावलं. शिवरायांनी ह्या स्वराज्याच्या रोपट्याचं बीज इथल्या गोरगरीब रयतेच्या मनात पेरलं, हे स्वतंत्र राज्याचं रोपटं वाढविण्यासाठी शिवरायांनी साऱ्या बारा बलुतेदार,अठरापगड...

जावं सह्याद्रीत...!

Image
सह्याद्री म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आणि इथले गडकिल्ले म्हणजे त्या विद्यापीठातील विषय. सह्याद्रीच्या या दऱ्या खोऱ्यात पाऊल पडलं कि आपसूकच हे विद्यापीठ आपल्याशी बोलू लागत अन इथले विषय असलेले गडकिल्ले इथं घडलेल्या इतिहासातून प्रेरणा देत आलेल्या आव्हानांना कसं सामोरं जायचं यासोबत आयुष्य जगण्याची कला शिकवतात. जावं त्या सह्याद्रीच्या कुशीत धरावी ती गडाची आडरानातली अनवट वाट अनुभवावी ती पाय जड करणारी चढण. जावं सह्याद्रीत त्या कडेकपारीतून घुमणारा शिवनामाचा गजर ऐकून व्हावं तृप्त. जावं सह्याद्रीत त्या बेलाग कातळ कड्यांशी सलगी करायला अनुभवावा त्या राकट कड्यांमधून ओघळणारा मायेचा पाझर. जावं सह्याद्रीत पहावी ती सूर्यनारायणान सूर्योदय अन सूर्यास्ताला मुक्त हस्ते केलेली रंगांची उधळण. जावं सह्याद्रीत कराव्यात गुजगोष्टी सह्याद्रीचा अनमोल दागिना असणाऱ्या त्या गडकोटांसोबत.  कधी काळी गजबजून गेलेला गड आज ओस पडलाय गडावर गेल्यावर इथं घडलेल्या इतिहासाशी एकरूप झालं कि हेच ओस पडलेले दगड धोंडे आपल्याशी बोलू लागतात. गडावर गेल्यावर ठेवावा माथा त्या महाद्वाराच्या पायरीवर मायबाप जाणत्या राजाच्या ...

रायलिंग पठार

Image
डिसेंबर उजाडू लागला कि या वर्षाखेरला कुठली भटकंती करायची याची शोधाशोध चालू होते. जसं भटकंतीचा दिवस जवळ येतो तसं विक्याची अन माझी फोनाफोनी वाढू लागते. या वर्षाखेरला दिवाळीच्या वेळेसचा राखून ठेवलेला प्लॅन सोनगिरी अन बाकीच्या चार किल्ले करायचं ठरलं होतं त्यानुसार ३१ व १ कि १ अन २ तारखेला जायचं हा प्रश्न होता कारण कॉलेजला होतो तेव्हा बरं होतं पाहिजे तेव्हा सुट्टी घेत होतो पण आता ३१ ला सुट्टी मिळत न्हवती त्यामुळं १ व २ तारीख ठरली. वारी गडकोटांचीच्या सगळ्या सरदार उमरावांना आवताण धाडली बाबा तर घरी होता त्यामुळं तो येणार न्हवता पंक्या,शुभम,वैभव,विक्या व मी असं पाच जण जाणार होते. ठरल्याप्रमाणं निघायच्या आदल्या दिवशी रात्री मी विक्या शुभम फायनल प्लॅन ठरवायला बसलो कुठला किल्ला आधी कुठला नंतर मुक्काम कुठं करायचा हे सगळं ठरवेपर्यंत ११ वाजले. पंक्याला आधीच सांगितलं होत असं असं उद्या जायचं आहे त्यावेळेस येतो बोलला व नंतर रात्री सडे अकराला फोन करून म्हणतोय जमायचं नाही उद्या मग आधी त्याला चार शिव्या ऐकवून विक्याला फोन केला असा असा शॉट झालाय पंक्या नाही म्हणतोय कसं करायचं कारण चार किल्ले करायचं ...

किल्ले घनगड

Image
दिवाळीत एक तरी गड झालाच पाहिजे नाहीतर दिवाळी साजरी झाल्यासारखं वाटत नाही. या दिवाळीला राजगड ते रायगड R2R करायचं ठरलं पण जसं दिवाळी जवळ येऊ लागली तसं R2R साठी सुट्ट्यांची जुळवा जुळवा करायच चालू झालं कारण कोणाला एक दिवस फक्त लक्ष्मीपूजनची सुट्टी तर कोणाला दोन दिवस सुट्ट्या अन R2R साठी तीन दिवस तर आरामात पाहिजेत त्यामुळं R2R होईल कि नाही माहित न्हवत त्यामुळं मी दुसरा प्लॅन सुद्धा तयार ठेवला होता. दिवाळीतल्या या भटकंतीला बाबा पंक्या घरी असल्यानं ते पण येणार न्हवते त्यामुळं उरलो आम्ही ४-५ जणच आणि सुट्ट्या जास्त नसल्यानं R2R ची मोहीम बाजूला ठेवावी लागली. सगळेजण सारखं या खेपला R2R नक्की करायचा म्हणत असतात पण काही ना काही कारणांनी R2R रखडतो आता त्या राजधान्यांनाच ठाऊक त्यानां जोडणारी R2R ची मोहीम केव्हा घडून येते. विक्यानं मला विचारलं, "R2R नाही मग दुसरं कुठं जायचं?" दुसरा प्लॅन तयार होता मागच्या वेळी ६ जूनला सुधागड तालुका केला होता यावेळी त्याच बाजूचे खोपोली पट्ट्यातले राहिलेले किल्ले सोनगिरी, सोंडाई, भिवगड व कोथळीगड हे किल्ले करायचं ठरलं. नेहमीप्रमाणे मी अन विक्याने बसून, मुक्का...

संडे भटकंतीनामा - ऐतिहासिक सासवड नगरी व सरदार पानसे वाडा

Image
मागेच रविवारी राहून गेलेला ढवळगड व दौलतमंगळ (भुलेश्वर मंदिर) केला व गेला रविवार कानिफनाथच्या समोर असलेला मिनी केंजळगड करून आलो होतो. शनिवारी रात्री विक्याला फोन केला," हा जाऊ रे उद्या" कुठं जायचं ते सकाळी भेटल्यावर ऑन द स्पॉट ठरणार होतं. सकाळी सहाला विक्याला गाठलं अन कुठं जायचं ठरवू लागलो पाउसामुळं वडकीतून ज्वाला मारुतीची वाट धरन सोयीचं न्हवतं तर कानिफनाथला "ट्रॅकिंग" वाल्यांची गर्दी वाढत होती त्यामुळं रविवारसाठी नवीन नवीन ठिकाण शोधू लागलो. हि दर रविवारची भटकंती म्हणजे मोठ्या ट्रेकसाठी ठरलेल्या तारखांपैकी पुढची तारीख येईपर्यंत पुरणारं टॉनिक म्हणजे संडे भटकंती. आज सासवड नगरी फिरायचं ठरलं. तसेच वेळ मिळाला तर जाता जाता सोनोरी गावात असलेला सरदार पानसे यांचा वाडा पहायचा होता. पुर्वी इथं सहा वाडया होत्या कालांतराने त्याचे गावात रुपांतर झाले. वटेश्वरापाशी ‘वरखेडवाडी’, सिद्धेश्वरपाशी ‘सरडी’, सदतेहे बोरीचे पटांगण, ‘संवत्सर गांव’ सोपानदेवापाशी, ‘दाणे पिंपळगाव’ टाकमाई मंदीरापाशी, जुन्या भैरवनाथाजवळ ‘सनवडी’ जसा काळ बदलत गेले तसं  या वाड्यांचे स्वरूप व विस्तार बदलून ...